प्रतिनिधी,चिपळूण
Chiplun Rain Update : कोळकेवाडी धरण व धरण परिसरात काल रात्री ८ वाजल्यापासून मुसळधार पाऊस सुरु झाला आहे.सद्यस्थितीत महाजेनकोचे चारपैकी तीन युनिट चालू असल्यामुळे वक्रदाराद्वारे सांडव्यावरुन पाणी विसर्ग करण्याची शक्यता नाकारता येत नाही. बोलादवाडी नाला व वाशिष्ठी नदी पात्रालगत नागरिकांना न जाण्याचा इशारा देण्यात यावा,असे पत्र कोळकेवाडी धरण व्यवस्थापन उपविभाग आलोरेचे उपविभागीय अभियंता यांनी कोळकेवाडी,नागवे,आलोरे,पेंढाबे,खडपोली,पिंपळी खु.पिंपळी बु. सती व खेर्डी सरपंचांना पाठवले आहे.
रत्नागिरी अपडेट
-सध्या वशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. नाईक कंपनी मच्छी मार्केट, वडनाका, मुरादपूर येथील काही ठिकाणी १ फूट पाणी भरलेले आहे. सध्या पाणी कमी होत आहे.
-नगरपालिकेच्या बोटी सांस्कृतिक केंद्र, शंकरवाडी, बाजारपेठ विसर्जन घाट, एसटी सॅन्ड, नगरपालिका कार्यालय या ५ ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत.
– नगरपालिका पथके ९ ठिकाणी तैनात आहेत.
-तलाठी, पोलीस व एऩडीआरएफ पथके ६ ठिकाणी तैनात केलेली आहेत. एका पथकात ५ तलाठी, ३ पोलीस व ३ जवान आहेत. या पथकासोबत एकूण ४ बोटी आहेत.
– ठिकाणे- नाईक कंपनी, ओसवाल शॅापी, वडनाका, मुरादपूर, सांस्कृतिक केंद्र, पेठमाप
-सध्या एका कुटुंबातील ३ व्यक्तींना स्थलांतरीत करण्यात आलेले आहे. परशुराम घाटातील वाहतूक सुरळीत सुरू आहे. कोणतीही समस्या नाही.
-कुंभार्ली घाटात दरड कोसळलेली होती. तेथील दरड बाजूला करण्याचे काम सुरू आहे. आता दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू आहे.
-कोकण रेल्वे- कोणतीही समस्या नाही. रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू आहे.
-मिरजोळी जुवाड येथील १९ कुटुंबातील ६५ व्यक्तींना स्थलांतरीत करण्यात आलेले आहे. ते सर्वजण आपल्या नातेवाईकांच्या घरी स्थलांतरीत झाले आहेत.
-जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या आदेशाने चिपळूण व खेड या दोन्ही तालुक्यांतील शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे.