वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जपानमधील योकोहामा येथे सुरु असलेल्या जपान खुल्या पीएसए चॅलेंजर स्क्वॅश स्पर्धेत भारताची महिला स्क्वॅशपटू जोश्ना चिन्नाप्पाने उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात 39 वर्षीय चिन्नाप्पाने इजिप्तच्या दुसऱ्या मानांकित गॅरेसचा 11-8, 15-13, 11-9 असा पराभव केला. आता उपांत्य फेरीत चिन्नाप्पाची लढत इजिप्तच्या चौथ्या मानांकित राणा इस्माईल बरोबर होणार आहे. राणा इस्माईलने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात फ्रान्सच्या बाल्टेनचा 11-7, 11-4, 11-9 असा पराभव केला.









