वृत्तसंस्था/ लॉसेन
चीनचा पुरुष वेटलिफ्टर तसेच तीनवेळा ऑलिम्पिक विजेतेपद मिळवणारा लियु झियाओजुन हा उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्याची माहिती गुरुवारी आंतराष्ट्रीय चाचणी एजन्सीने दिली आहे.
चीनचा वेटलिफ्टर झियाओजुन याने आतापर्यंत तीनवेळा ऑलिम्पिक स्पर्धेत चॅम्पियनशिप पटकाविले आहे. 30 ऑक्टोबर रोजी सराव करीत असताना त्याची उत्तेजक चाचणी घेण्यात आली होती. त्याच्या मुत्रल नमुन्यामध्ये निर्बंध घातलेले द्रव आढळून आल्याचे सांगण्यात आले. 38 वर्षीय लियुने गेल्या वर्षी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सलग तिसऱयांदा सुवर्णपदक मिळवले होते. 2024 मध्ये होणाऱया पॅरीस ऑलिम्पिकमध्ये तो चौथे सुवर्णपदक मिळवण्यासाठी आतुरलेला आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या 81 किलो वजन गटात त्याने सुवर्णपदक मिळवले होते.









