हा प्रकार टाईम बॉम्बसारखा : युद्धावेळी सैन्याचे संचालन ठप्प करण्याची क्षमता
वृत्तसंस्था/ बीजिंग
जो बिडेन यांचे प्रशासन अमेरिकेच्या सैन्य नेटवर्कमध्ये चीनच्या एका व्हायरसचा शोध घेत आहे. चीनने अमेरिकेच्या सैन्याचे पॉवर ग्रिड, कम्युनिकेशन सिस्टीम आणि वॉटर सप्लाय नेटवर्कमध्ये एक कॉम्प्युटर कोड (व्हायरस) घुसविला आहे. युद्धादरम्यान या व्हायरसच्या मदतीने सैन्याचे संचालन चीन ठप्प करू शकतो अशी भीती अमेरिकेच्या प्रशासनाला वाटत आहे.
चीनचा हा कोड केवळ अमेरिका नव्हे तर जगभरातील त्याच्या सैन्यतळांच्या नेटवर्कमध्ये असू शकतो. सैन्याच्या नेटवर्कमध्ये चीनचा कोड असणे एखाद्या टाइम बॉम्बसारखे आहे. यामुळे अमेरिकेच्या सैन्याच्या मोहिमेवर प्रभाव पडण्यासह सैन्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरशी संबंधित सर्व प्रतिष्ठानांनाही नुकसान पोहोचणार असल्याचे अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.
अमेरिकेच्या मिलिट्री नेटवर्कमध्ये चीनच्या व्हायरसचा शोध लागल्यापासून व्हाइट हाउसच्या सिच्युएशन रुममध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे. सैन्याचे वरिष्ठ अधिकारी, गुप्तचर प्रमुख आणि राष्ट्रीय सुरक्षा अधिकारी या बैठकांमध्ये सामीत झाले आहेत. अमेरिकेचे महत्त्वपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर रेल्वे, पाणीपुरवठा, नागरी उ•ाण क्षेत्राला वाचविण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत असल्याचे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते एडम होज यांनी म्हटले आहे.









