Chinese Spy Balloon : चीन नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असतो. आताही चीनने अमेरिकच्या अवकाशात स्पाय बलून सोडले आहे. याचा याचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.अमेरिकेने हा बलून उध्दवस्त करण्याचा विचार केला, मात्र लोकांच्या सुरक्षेचा विचार करुन या बलूनवर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितले आहे.
नेमके काय घडलय
काल अमेरिकेच्या अवकाशात एक पांढरी वस्तू दिसून आली.अमेरिका सिक्यूरीटी एजन्सीला याची माहिती मिळताच तुरंत अलर्ट जारी कऱण्यात आला. अमेरिका सिक्यूरीटी एजन्सीने याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता चीनी गुप्तहेराचा आकाशात स्पाय बलून दिसून आला.यानंतर तात्काळ अलर्ट जारी करण्यात आला. ज्याठिकाणी अमेरिकेच्या एअरबेस आणि स्ट्रॅटेजिक मिसाइल आहेत अशा उत्तर-पश्चिम क्षेत्रात हा बलून उडताना दिसून आला.यावर अॅक्शन घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी चर्चा केली. मात्र लोकांच्या सुरक्षेचा विचार करुन या बलूनवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.अमेरिकेत असा स्पाय बलून दिसणे ही पहिली वेळ नाही तर याआधीही चीन ने अमेरिकेत स्पाय बलून पाठवलेत.आता दिसणारा हा बलून पहिल्यांदा पायलटला दिसून आला. याबाबत त्या पायलटने अमेरिका सिक्यूरीटी एजन्सीला माहिती दिली होती.
Previous Articleकसबा, चिंचवडसाठी भाजपचे उमेदवार आज रात्री जाहीर होणार
Next Article मुंबई-नाशिक महामार्गावर प्राजक्त देशमुखचा अपघात









