India China Border Dispute भारतीय लष्कराने अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमधील विवादित वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) चिनी पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) च्या सैनिकांना रोखल्याची माहीती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज मंगळवारी संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये बोलताना सांगितले.विरोधी पक्षाच्या खासदारांनी यासंदर्भात विचारणा केल्य़ामुळे त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते.
आपल्या भाषणात, संरक्षण मंत्री म्हणाले की “या मुठभेडीत कोणताही सैनिक मरण पावला नाही किंवा मोठी दुखापत झाली नाही.” सीमेवरिल अशा घटनांना तोंड देण्यासाठी भारतीय जवान सज्ज असल्याचे सांगून संरक्षण मंत्र्यांनी सैनिकांच्या शौर्याचे कौतुक केले आहे. अत्यंत संवेदनशील अशा लडाख सेक्टरमध्ये जून 2020 मध्ये झालेल्या गलवान व्हॅली घटनेनंतर अरुणाचल फेसऑफ ही अशी पहिलीच चकमक आहे.
विरोधकांना या विषयावर ऐक्याचे आवाहन करताना संरक्षण मंत्री म्हणाले “मी या सभागृहाला खात्री देतो की, भारतीय सैन्य प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध असून ते कोणत्याही प्रयत्नांना हाणून पाडतील. आणि मला विश्वास आहे की हे संपूर्ण सभागृह त्यांच्या मागे उभे राहीतील.”
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









