नवी दिल्ली :
जागतिक स्तरावर इलेक्ट्रिक कार आणि बॅटरीच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या बीवायडी या चिनी कंपनीने भारतात इलेक्ट्रिक वाहने आणि बॅटरी बनवण्यासाठी 1 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव दिला आहे.
भारतात बीवायडी स्थानिक कंपनीसोबत संयुक्तपणे उत्पादन करेल. यासाठी भारतीय नियामकांकडून परवानगी मागितली आहे. अहवालानुसार, चीनच्या बीवायडी कंपनीने स्थानिक कंपनीच्या भागीदारीत भारतात इलेक्ट्रिक वाहने आणि बॅटरीज तयार करण्यासाठी 1 अब्ज डॉलर गुंतवणुकीचा प्रस्ताव सादर केला आहे. खासगी मालकीच्या हैदराबादस्थित मेघा इंजिनीअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चरने बीवायडीसोबत हातमिळवणी केली आहे आणि संयुक्त इलेक्ट्रिक वाहन प्रकल्प स्थापन करण्याची परवानगी मागणारा प्रस्ताव भारतीय नियामकांना सादर केला आहे.









