आचरा / प्रतिनिधी
Chinder Gram Panchayat employee Bhaskar (Aba) Pawar passed away
मालवण तालुक्यातील चिंदर ग्रामपंचायत कर्मचारी भास्कर उर्फ आबा पवार यांचे काल 1 एप्रिल रोजी संध्याकाळी 7 वाजता मालवण येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते (49) वर्षाचे होते.रविवारी सकाळी चिंदर भटवाडी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्यांचे अत्यसंस्कार करण्यात आले. शांत, सुस्वभावी, प्रामाणिक, विश्वासू या गुणांनसाठी ते सुपरिचित : होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहिणी असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने चिंदर पंचक्राशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.









