चिंचवड आणि कसबा पेठ येथिल पोटनिवडणुका ह्या विनविरोध व्हाव्यात यासाठी भाजप आणि शिंदे गटाने प्रयत्न सुरु केले आहे. यासाठी भापच्या वरिष्ठ नेत्यांपासून मुख्यमंत्र्यापर्यंत सगळ्यांनी विरोधी पक्षांना आवाहन करण्यास सुरवात केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही निवडणुका विनविरोध व्हाव्या यासाठी पत्र काढले आहे.
महाविकास आघाडीचे जेष्ठ नेते अजित पवार यांनी या निवडणुकीबाबत मत व्यक्त करून यामध्ये स्पष्टता आणली आहे. ते म्हणाले, “चिंचवड आणि कसबा निवडणूक बिनविरोध होण्याचे काही कारण नाही.भाजपने पंढरपूर, कोल्हापूर आणि देगलूरची निवडणूक बिनविरोध होऊ दिली नाही. फक्त एका मुंबईतील जागा बिनविरोध केली म्हणजे बाकीच्या निवडणुका बिनविरोध होतील हे त्यांनी डोक्यातून काढून टाकले पाहीजे. ही लोकशाही असल्याने जनतेला ज्यांना मतदान द्यायचे त्यांना देतील” अशी स्पष्ट भूमिका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मांडून या निवडणुका होणारच असे जाहीर केले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








