शनिवारी अमेरिकेच्या अटलांटिक किनार्यावर चिनी बनावटीचा गुप्तहेर फुगा अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणाकडून पाडण्यात आला. त्यानंतर बायडेन प्रशासनाने पेंटागॉन प्रशासनाचे कौतुक केल्यानंतर चीनने या गोष्टीचा तीव्र निषेध नोंदवून अमेरिकेच्या या कृतीला लवकरच योग्य उत्तर दिले जाईल असे जाहीर केले आहे.
गेले काही अमेरिकेच्या अवकाशात चीनी बनावटीचा एअर बलून फिरत होता. अमेरिकेने यावर आक्षेप घेउन चीन या फुग्यातून अमेरिकेची हेरगीरी केली जात असल्याचा आरोप केला गेला. माध्यमात याविषयी अनेक चर्चा झाल्यावर अमेरिकेने शेवटी यावर कारवाई करून तो एअऱ बलून पाडण्यात आला.
दक्षिण कॅरोलिना प्रांताच्या दक्षिण-पूर्व राज्याच्या किनारपट्टीवर F-22 विमानातून डागलेल्या क्षेपणास्त्राने या बलूनचे लक्ष्य करण्यात आले. आधी या यानाने उत्तर अमेरिकेवर अनेक दिवस उड्डाण केले होते. अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी या ऑपरेशनला “जाणूनबुजून आणि कायदेशीर कारवाई” असे म्हणुन चीनने “अमेरिकेच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन” केल्याचे म्हटले आहे. त्यानंतर चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने एका निवेदनात अमेरिकेच्या कारवाईचा निषेध केला. “नागरी” विमान पाडणे हे स्पष्टपणे आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. तसेच या गोष्टीला लवकरच जशाच तसे उत्तर दिले जाईल असा इशाराही चीनच्या प्रवक्त्यांनी दिला.
Previous Article‘अब कि बार…किसान सरकार’चा केसीआर यांचा नारा…राष्ट्रीय राजकारणाची सुरवात महाराष्ट्रातून
Next Article बिनविरोध…? डोक्यातून काढून टाका- अजित पवार









