1 बॉटलची किंमत 600 रुपये
चीनमध्ये आजारावरील उपचारात लोकांना वाघाचे मूत्र प्राशन करायला दिले जात आहे. चीनमध्ये वाघाच्या मूत्राला आजारावरील उपचाराच्या स्वरुपात वापरले जाते. वाघाच्या मूत्राने भरलेली एक बाटली तेथे सुमारे 600 रुपयांमध्ये विकली जाते. दक्षिण पश्चिम चीनच्या सिचुआन प्रांतातील एक प्राणिसंग्रहालय वाघाच्या मूत्राला आर्थरायटिसवरील उपचार म्हणून विकत आहे.
पर्यटकांदरम्यान प्रसिद्ध याआन बिफेंगक्सिया वाइल्डलाइफ जू सायबेरियन वाघांच्या मूत्राची विक्री करत आहे. प्राणिसंग्रहालय या कथित औषधी मूत्राची बाटली 50 युआन (596 रुपये) मध्ये विकत आहे. एका बाटलीत 250 मिलिलीटर वाघाचे मूत्र असते. या बाटल्यांवर आर्थराइटिस, स्नायूवेदना यासारख्या आजारांमध्ये चिकित्सीय प्रभाव पडत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
वाघाच्या मूत्राचा कशाप्रकारे वापर करावा याची सूचनाही प्राणिसंग्रहालयाने केली आहे. यानुसार वाघाच्या मूत्राला व्हाइट वाइन आणि आल्याच्या तुकड्यांसोबत मिसळावे, यानंतर जेथे गरज असेल तेथे ते लावावे, यामुळे वेदना अन् आजार बरा होईल असा दावा आहे. वाघाच्या मूत्राचे प्राशनही करता येऊ शकते, परंतु एखादी
अॅलर्जी असेल तर ते टाळावे असे प्राणिसंग्रहालयाने म्हटले आहे.
वाघाच्या मूत्रविसर्जनानंतर ते एका बेसिनमधून एकत्र केले जाते. परंतु ग्राहकांना विकण्यापूर्वी ते किटाणूरहित केले जाते की नाही स्पष्ट करण्यात आलेले नाही. वाघाच्या मूत्राची विक्री प्रतिदिन दोन बाटल्या इतकीच होत असल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले. तर चीनमधील डॉक्टर याच्या विरोधात उतरले आहेत. हुबेई प्रोविंशियल ट्रॅडिशनल चायनीज मेडिसीन हॉस्पिटलच्या एका फार्मासिस्टने वाघाच्या मूत्राच्या औषधीय दाव्यांना फेटाळले आहे. वाघाच्या मूत्राचा पारंपरिक चिनी चिकित्सेत कुठलाही आधार नाही, यामुळे लाभ होतो याचा कुठलाही शास्त्राrय पुरावा नाही. वाघाच्या मूत्रासारख्या अप्रमाणित उपचारांना चालना दिल्यास नुकसानच होईल असे त्याने म्हटले आहे.









