वृत्तसंस्था / नवी दिल्ली
एफ-1 ग्रा. प्रि. मोटार शर्यती फेडरेशनने 2030 पर्यंतचे आपले वेळापत्रक निश्चित केले असून चीनमध्ये होणाऱ्या शांघाय ग्रा. प्रि. एफ-1 शर्यतीला 5 वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तब्बल 5 वर्षांनंतर आता चीनमध्ये एफ-1 मोटार शर्यतीचे यशस्वी पुनरागमन होत आहे.
नुकत्याच येथे झालेल्या 2024 च्या चायनिज ग्रा. प्रि. शर्यतीचे विजेतेपद मॅक्स व्हर्स्टेपनने पटकाविले. या शर्यतीला चीनमध्ये सुमारे 2 लाख शौकिनांनी प्रचंड प्रतिसाद दिला. आता पुढील वर्षांपासून चीनमधील या शर्यतीचे शांघाय ग्रा.प्रि. असे नवे नामकरण करण्यात येणार आहे. आतापर्यंत एफ-1 ग्रा. प्रि. मोटार शर्यतीच्या इतिहासामध्ये चीनमध्ये लेव्हीस हॅमिल्टनने एकदा तर फर्नांडो अलोन्सोने दोनवेळा विजेतेपद मिळविले आहे. 2025 च्या ग्रा. प्रि. मोटार शर्यतीच्या वेळापत्रकानुसार चीनमधील ही स्पर्धा 21 ते 23 मार्च दरम्यान घेतली जाणार आहे. 2025 च्या ग्रा. प्रि. हंगामाला चीनमधील या शर्यतीने प्रारंभ होईल.









