प्रत्येक गोष्टीत मदत करणाऱ्या महिलांची मुले अधिक बुद्धीमान
मुलांच्या जीवनात आईची भूमिका महत्त्वाची असते ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. आईचे समर्थन मुलांसाठी मिळणे महत्त्वाचे असते. आई जेव्हा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मुलांना अधिक सहकार्य करते, तेव्हा मुलांचा सामान्य बुद्ध्यांक देखील अधिक असतो. हा प्रभाव मुलांवर आयुष्यभरासाठी असतो असा दावा इंटेलिजेन्स या नियतकालिकात प्रकाशित अध्ययनात करण्यात आला आहे.
संशोधकांनी 1,075 मुलांना अध्ययनात सामील केले होते. यात वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या मुलांना आणि मुलींना सामील करण्यात आले होते. याच्या निष्कर्षांतून सहाय्यक आई असण्याचा थेट प्रभाव मुलाच्या बुद्धीवर पडत असल्याचे दिसून आले. महिलांनी स्वत:च्या मुलांबद्दल अधिक समर्थन दर्शविल्यावर मुले अधिक चांगली कामगिरी करू लागल्याचे अध्ययनात आढळून आले आहे.

जीवनाच्या प्रारंभी सामान्य बुद्धीत व्यक्तिगत अंतर बऱ्याचअंशी एकाच घरात राहणाऱ्या लोकांकडून पुरविण्यात आलेल्या वातावरणामुळे असते. तर प्रौढ झाल्यावर मोठ्या प्रमाणावर मतभेद हे आनुवांशिकतेमुळे असतात असे अध्ययनाचे लेखक आणि संशोधक कर्टिस डंकल यांनी सांगितले आहे. अध्ययनादरम्यान मुलांच्या (14 महिन्यांपासून 10 वर्षे वयापर्यंत) बौद्धिक क्षमतेचे मूल्यांकन शब्दावली तयार करणे आणि ती समजून घेणे आणि मानसिक विकास परीक्षणाच्या मदतीने करण्यात आले आहे.
मुलांवर हा प्रभाव प्रौढत्वाची सुरुवात होईपयंत अधिक राहतो. हा वयातील महत्त्वाचा टप्पा आहे. बौद्धिक कामगिरीत तेव्हा किंचित वृद्धीही महत्त्वपूर्ण असू शकते. स्पर्धा परीक्षेची तयारी किंवा महाविद्यालयातील प्रवेशासाठी हेच वय असते असे डंकल यांचे सांगणे आहे. परंतु वयाच्या 40 व्या वर्षात सामान्य बुद्धीसाठी आईचे समर्थन महत्त्वाचे असत नाही, परंतु हे कुठल्याही व्यक्तीच्या जीवनात महत्त्वपूर्ण असू शकते. आईच्या सहकार्याला प्रोत्साहत देत आईवडिल संभाव्य स्वरुपात मुलांच्या दीर्घकालीन बौद्धिक कामगिरीत महत्त्वाचे योगदान देऊ शकतात.
आईवडिलांशी उत्तम जवळीक
आईचे सहकार्य कालौघात कमी झाले असले तरीही महत्त्वपूर्ण आहे. दीर्घ कालावधीत आई किती सहाय्यक होती याचा फारसा फरक पडत नाही. जी मुले स्वत:च्या विचारांना प्रोत्साहित करण्यासाठी स्वत:च्या आईवडिलांच्या प्रयत्नांमध्ये अधिक रुची दाखवत होते, त्यांना स्वत:च्या आईकडून अधिक प्रोत्साहत मिळत होते. हा प्रकार सामान्य बुद्ध्यांक अधिक करण्यास महत्त्वाचे योगदान देऊ शकतो. वय वाढण्यासोबत आईचे सहकार्य कमी होते, परंतु याचा समग्र प्रभाव संपत नाही असे अध्ययनात दिसून आल्याचे डंकल यांनी सांगितले.









