बेळगाव तालुक्यातील बसुर्ते गावात सुगंधा मोरे (५०) या अंगणवाडी मदतनीस यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. सुंगधा यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्या जीवनमरणाचा संघर्ष करत आहे. अंगणवाडीतील मुले शेजारच्या घराच्या आवारात उगवलेली फुले तोडत असल्याने अंगणवाडी मदतनीसला शाब्दिक शिवीगाळ करून त्यांच्यावर विळ्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला.याबाबत समजलेली अधिक माहिती अशी कि, अंगणवाडीतील मुले शेजारच्या घराच्या आवारात अंगणवाडीतील मुले खेळत होती. त्यावेळी तेथील घराच्या आवारात उगवलेली चमेलीची फुले या मुलांनी तोडली. त्यामुळे संतप्त झालेल्या घरमालकाने अंगणवाडी सेविकेला जब्बर मारहाण करून विळ्याने त्यांचे नाक कापले त्याच बरोबर त्यांच्या पतीला देखील जब्बर मारहाण करण्यात आली. नाक कापल्यानंतर अंगणवाडीसेविकेच्या फुफ्फुसातून रक्तस्त्राव झाल्याने ही महिला जीवनमरणाचा संघर्ष करत आहे. १ जानेवारी रोजी अंगणवाडी केंद्रासमोर घडलेली घटना रात्री उशिरा उघडकीस आली.मूक पतीसोबत अंगणवाडी मदतनीस म्हणून उदरनिर्वाह करणारी महिला आता जीवनमरणाची झुंज देत आहे. सध्या सुगंधा यांच्यावर बेळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी काकती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्यापपर्यंत पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नाही.
Trending
- schedule
- इंग्लंड महिलांचा दुसरा विजय
- दीपक, कमलजीत, राज चंद्रा यांना सांघिक सुवर्ण,
- सावंतवाडी शहरातील रस्ते आणि स्वच्छता व्यवस्थेची दूरवस्था
- न्हावेली शाळेच्या छप्पर दुरुस्तीसाठी ग्रामस्थांकडून शिक्षणमंत्र्यांना निवेदन
- शिवसंस्कारच्या माध्यमातून सावंतवाडीत इतिहास अभ्यासकांचा होणार सन्मान
- भाजप प्रवेश नाकारल्यामुळेच मंत्री केसरकर धनुष्यबाणावर लढतायत
- रत्नागिरी रेल्वे स्थानकाबाहेर कामगार सेनेचे जोरदार आंदोलन