उजव्या विचारसरणीयुक्त पालकांची मल
मुलांचे शिक्षा देण्याचे वर्तन त्यांचे त्यांच्या आईवडिलांच्या राजकीय विचारसरणीने प्रभावित असते. कॉन्झर्व्हेटिव्ह आईवडिल मुलांना शिक्षा देण्यात स्वकीय-परका असा भेदभाव करतात, ते कुठल्याही दुसऱया समुहाच्या मुलांना चुकीसाठी शिक्षा देण्यासाठी अधिक इच्छुक असतात. तर उदारमतवादी विचारसरणीचे आईवडिल च्gकुसाठी स्वतःच्या तसेच अन्य समुहाच्या मुलांना समान दंड करतात. अनेकदा तर चुकीसाठी स्वतःच्या समुहाच्या सदस्यासाठी अधिक कठोर ठरू शकतात. यासंबंधी न्यूयॉर्क विद्यापीठाच्या तज्ञांनी अध्ययन केले आहे.
राजकीय विचारसरणीचा मुलांचा शिक्षेशी असलेला संबंध समजून घेण्याचा प्रयत्न न्यूयॉर्क विद्यापीठाच्या तज्ञ राशेल ए रेशिन यांनी केला आहे. मुले सुरुवातीपासूनच अन्य मुलांना चुकीसाठी शिक्षा देण्यास तत्पर असतात, मग त्या चुकीचा त्यांच्यावर कुठलाही परिणाम झालेला नसो. ते यासाठी कुठलीही किंमत फेडण्यास तयार असतात असे अध्ययनात दिसून आले आहे.

प्रौढांमध्येही हाच स्वभाव
हे वर्तन जगभरात विविध संस्कृतींमध्ये आढळून येते. केवळ लहान मुले नव्हे तर प्रौढांमध्येही हा स्वभाव दिसून येतो. कशाप्रकारे लहान मुले स्वतःच्या आसपासच्या सामाजिक वातावरणातून मूल्य आणि विश्वास ग्रहण करतात हे रंजक आहे. अशाप्रकारची शिक्षा चूक करणाऱयाबद्दल नाराजी जाहीर करणे आणि त्यासाठी दंड करण्याची इच्छा दर्शवित असल्याचे लेशिन यांचे म्हणणे आहे. कॉन्झर्व्हेटिव्हना अधिक प्रामाणिक आणि अन्य समुहांबद्दल विरोधी भूमिका बाळगण्याशी जोडले जाते. दुसरीकडे उदारमतवादी विचारसरणीत प्रामाणिकतेपेक्षा निष्पक्षतेला प्राथमिकता दिली जाते. कठोर शिक्षेऐवजी सुधारणावादी शिक्षेला प्राधान्य देण्यात येते. या अध्ययनात 8 वर्षे वयांपर्यंतच्या मुलांवर दोन प्रयोग करण्यात आले. पहिल्या प्रयोगात न्यूयॉर्कच्या म्युझियमधील मुलांची निवड करण्यात आली. दुसऱया प्रयोगात अमेरिकेच्या डाटाबेसमधून मुलांची निवड केली गेली. निम्म्या मुलांनी चुकीसाठी शिक्षा देण्याचा निर्णय घेतला. तर उर्वरित मुलांनी शिक्षा न करण्याचा निर्णय घेतल्याचे लेशिन यांनी सांगितले









