सरपंच सचिन तोडणकर यांच्या पुढाकाराने जि. प. शाळेतील मुलांना झाले आकाशदर्शन
मनोज पवार : दापोली
नुसत्या डोळ्यांनी दिसू न शकणारे आकाशातील ठळक तारे, ग्रह, तारका समूह, नक्षत्र, राशी, तारका गुच्छ याचीडोळा अनुभवण्याचा आनंद दापोली तालुक्यातील कर्दे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना नुकताच आला. निमित्त होते सरपंच सचिन तोडणकर यांच्या कर्दे समुद्रकिनारी रात्री साकारलेला आकाश दर्शनाचा कार्यक्रम.
दापोली मधील कर्दे ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद शाळा कर्दे मधील विद्यार्थ्यां करिता शनिवारी रात्री आकाश दर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. एकाच वेळी पहिली ते सातवीच्या सुमारे 100 विद्यार्थ्यांनी, त्यांच्या पालकांनी व बीचवर उपस्थित असणाऱ्या पर्यटकांनी सूर्यमालेतील चार ग्रह पाहिले.
विद्यार्थ्यांमध्ये खगोलशास्त्र आणि विज्ञान याची आवड निर्माण व्हावी या साठी आकाश दर्शन कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे यावेळी सरपंच सचिन तोडणकर यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमासाठी चिपळूण येथील तारांगण ग्रुपचे दीपक आंबवकर यांनी आकाशातील गमती जमती अगदी सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना उलगडून सांगितल्या. त्यांनी सर्वप्रथम लेझर पॉइंटरने आकाशातील ठळक तारे, ग्रह, तारका समूह, नक्षत्र, राशी, तारका गुच्छ यांची ओळख करून दिली. आकाशातील तारका समुहांच्या आकृत्या लेझर पॉइंटरद्वारे तयार करून विद्यार्थ्यांना नक्षत्र ओळख करून दिली.
Previous Articleदर घसरल्याने खणदाळच्या शेतकऱ्यांने कोबीवर फिरवला रोटर
Next Article सरवडेत वैकुंठ गमन सोहळ्यास १८ पासून प्रारंभ








