कोल्हापूर :
बालविवाह करणे कायद्याने गुन्हा आहे, हे माहित असूनही शहरातील ब्रम्हपुरी परिसरातील एका हॉलमध्ये एका अल्पवयीन तऊणीबरोबर बालविवाह झाला. या प्रकरणी लक्ष्मीपूरी पोलिसात नवरदेवासह त्यांचे आई, वडील आणि सासू, सासरा अशा पाच जणांविरोधी बालविवाह प्रतिबंधक कायद्यासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यामध्ये नवरदेव उमर जमिर बागवान (वय 25), त्याची आई शाहीन जमिर बागवान, वडील जमिर बागवान (सर्व रा. बागवान गल्ली, बिंदू चौक, कोल्हापूर) आणि अल्पवयीन तऊणीची आई यास्मीन इम्रान बागवान, वडील इम्रान बागवान (रा. बागवान नगर, मुळेगाव रोड, सोलापूर) या पाच जणाचा समावेश आहे.
पाच संशयितांना विवाह लावून दिलेली तऊणी अल्पवयीन आहे. हे माहीत असताना देखील सर्व संशयितांनी संगणमत करून, तिचे लग्न संशयीत उमर बागवान या तऊणाबरोबर बालविवाह कऊन देण्याचे ठरविले. हा बालविवाह शहरातील ब्रम्हपूरी येथील एका हॉलमध्ये 20 जानेवारी रोजी झाला. सामाजिक कार्यकर्त्याना यांची माहिती समजताच त्यांनी याबात पोलिसांना दिली. पोलिसांनी या बालविवाहाची तपासणी कऊन, याविषयी गुन्हा दाखल केला.








