प्रतिनिधी/ पणजी
एनडीए कार्यकर्ता संमेलनानिमित्त बिहार येथे गेलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बिहारमधील विविध कॅबिनेट मंत्री आणि नेत्यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. त्याचबरोबर पाटणा आणि दरभंगा येथे झालेल्या संमेलनात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली ‘विकसित भारत, विकसित बिहार’ या संकल्पनेला दुजोरा दिला. बिहारचा विकासरथ पुढे चालला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पुढे बोलताना त्यांनी, युवा शक्ती, नारी शक्ती, किसान कल्याण आणि गरीब कल्याण यांच्या बळावर आम्ही बिहारच्या कानाकोपऱ्यात सेवा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले.
मुख्यमंत्री सावंत यांनी पटना येथे आगमन झाल्यानंतर मंत्री नितीन नबीन यांची भेट घेऊन संवाद साधला. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांचीही भेट घेतली. ही भेट विकसित भारतच्या दृष्टिकोनातून आपल्या सामूहिक प्रयत्नांवर केंद्रित होती, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पटना येथे केंद्रीय वस्त्राsद्योग मंत्री शांडिल्य गिरिराज सिंह आणि खासदार संजय जयस्वाल यांच्याशी संवाद साधला.









