प्रतिनिधी/ पणजी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना लक्ष्य करण्यात आले असून अज्ञात संशयितांनी मुख्यमंत्र्यांचा अधिकृत ई-मेल आयडी हॅक करण्यात आल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी सकाळपर्यंत मुख्यमंत्र्यांचा ई-मेल गुन्हेगारांच्या ताब्यात होता, असेही दिसून आले.
ई-मेल आयडी हॅक करण्यात आल्याचे आढळल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून सायबर पोलिसांशी संपर्क करण्यात आला. सायबर विभागाकडून मुख्यमंत्र्यांचे क्रेडेन्शियल वापरून मुख्यमंत्र्यांना त्यांच्या ई-मेलचा ताबा पुन्हा मिळवून दिला. दरम्यान, ई-मेल आयडी हॅक करणारे गुन्हेगार कोण होते? त्यांचा हेतू काय होता? याचा तपास सायबर विभागाचे पथक करीत आहे.









