राज्यातील विविध मान्यवरांची उपस्थिती
सांखळी : राज्याचे मुख्यमंत्री तथा सांखळीचे आमदार डॉ प्रमोद सावंत यांचा 50 वा. वाढदिवस सांखळीतील राधाकृष्ण देवस्थान सभागृहात हजारोंच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने मतदारसंघात सेवा सुशासन दिवस साजरा करण्यात आला. या निमित्त राधाकृष्ण मंदिरात सत्यनारायण महापूजा, मंदिर परिसरात मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी हजारो संख्येने डॉ. सावंत याचे चाहते उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे वडील, पत्नी, आणि कन्या उपस्थित होत्या. राज्यातील सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. हिंदू संस्कृतीनुसार दिव्यांची ओवळणी करून मुख्यमंत्री सावंत यांचे स्वागत करण्यात आले. मतदारसंघातील सरपंच, पंच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोपाळ सुर्लकर ,पांडुरंग कुट्टीकर, संजय नाईक, सागर फडते, जागा गावकर, मनोहर वळवईकर, प्रशांत केरकर, सर्वेश घाडी, सुभाष फोंडेकर, संतोष मळीक, प्रियेश डांगी, गजानन नार्वेकर, पाळी सरपंच शिवदास मुळगावकर, वेळगे सरपंच सामंता कामत, सुर्ला सरपंच विश्रांती सुर्लकर, कुडणे सरपंच राजन फळकर, न्हावेली सरपंच कालिदास गावस, आमोणा सरपंच कृष्णा गावस, हरवळे उपसरपंच ममता दिवकर आदींसह विविध पंचायतींचे पंच सदस्यांसह उपस्थित होते. तसेच स्वाती मायणिकर, उन्नती सहस्त्रबुद्धे, सिद्धी परोब प्रभू, संघवी फडते, राधिका सातोस्कर, प्रशिला गावडे, एल. आमडकर, गौरवी सुर्लकर आदींसह हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
मतदारसंघात दिवसभर भरगच्च कार्यक्रम
सांखळी मतदारसंघात सोमवारी सेवादिवस निमित्ताने सर्व पंचायत विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम हरवळे येथील रुद्रेश्वर देवस्थान मंदिरात धार्मिकविधी, अभिषेक करण्यात आला.सामाजिक आरोग्य केंद्रात ऊग्णाना फळे वाटप करण्यात आला. शाळकरी मुलांना गणवेश, शैक्षणिक साहित्य देण्यात आले. भाजप कार्यकर्त्यांनी उत्साह रॅली कढण्यात आली होती. पाळी, वेळगे, सुर्ला, हरवळे,आमोणा, न्हावेली, कुडणे या पंचायत क्षेत्रातील ग्रामीण भागातील भाजपकार्यकर्ते आणि सावंत यांच्या चाहत्यांनी खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तसेच सरकारी सामाजिक लोकोपयोगी योजनांचा अनेकांना लाभ मिळवून देण्यात आला. या कार्यक्रमात स्वयंपूर्ण मित्र ही सहभागी झाले होते.









