सांखळीत पंतप्रधान शेतकरी सन्मान सोहळय़ात खासदार विनय तेंडुलकर उपस्थित
सांखळी / प्रतिनिधी
भारत देशात सर्वात आधी शेतकऱयांना सन्मानित करून त्यांना आर्थिक सहकार्य करणे आवश्यक होते. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींने आज शेतकरी सन्मान सोहळा आयोजित केला आहे. यामुळे त्यांना शेती व्यवसायात रुची निर्माण होईल. तसेच गोव्यात ही शेतकऱयांना चांगले मार्गदर्शन लाभत असून मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली कृषीखाते उत्कृष्ट कामगिरी बजावत आहे, असे प्रतिपादन खासदार विनय तेंडुलकर यांनी सांखळी नगरपालिका सभागृहात आयोजित पंतप्रधान शेतकरी सन्मान कार्यक्रमात केले.
यावेळी एच. आर. प्रभू, डॉ. प्रवीण कुमार, डिचोली नगराध्यक्ष कुंदन फुलारी, कबीर शिरगावकर, नगरसेवक शुभदा सावईकर, रश्मी देसाई, आनंद काणेकर, ब्रम्हा देसाई, दयानंद बार्येकर, गुरुप्रसाद नाईक इतरांची उपस्थिती होती.
यावेळी शेतकऱयांना मार्गदर्शन करणयात आले.









