वृत्तसंस्था / लखनौ
सध्या सुरू असलेल्या 2025 च्या महिलांच्या प्रिमीयर लीग टी-20 स्पर्धेत खेळणाऱ्या युपी वॉरियर्स संघाला उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या वाटचालीला शुभेच्छा दिल्या आहेत.
या स्पर्धेचा पुढील टप्पा आता लखनौमध्ये होणार आहे. लखनौतील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजिलेल्या समारंभामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी युपी वॉरियर्स महिला संघातील खेळाडूंना खास निमंत्रीत केले होते. या समारंभावेळी युपी वॉरियर्स संघातील दिप्ती शर्मा, तसेच अन्य खेळाडू उपस्थित होते. युपी वॉरियर्सचा या स्पर्धेतील पुढील सामना 3 मार्च रोजी लखनौमध्ये गुजरात जायंट्सबरोबर होणार आहे. त्यानंतर युपी वॉरियर्सचे सामने मुंबई इंडियन्स आणि आरसीबीबरोबर अनुक्रमे 6 आणि 8 मार्च रोजी खेळविले जाणार आहेत.









