‘कलामंदिर’च्या उद्घाटन समारंभात भाग घेणार
बेळगाव : मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे रविवार दि. 20 एप्रिल रोजी बेळगाव दौऱ्यावर येत आहेत. बेळगाव शहर व चिकोडी येथे विविध कार्यक्रमात भाग घेऊन विशेष विमानाने ते बेंगळूरला रवाना होणार आहेत. 20 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता विशेष विमानाने ते बेळगावला येणार आहेत. स्मार्ट सिटी अनुदानातून उभारण्यात आलेल्या टिळकवाडी येथील कलामंदिर बहुमजली इमारतीच्या उद्घाटन समारंभात ते भाग घेणार आहेत. त्यानंतर सुवर्णविधानसौध येथे कृषी खात्याच्यावतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात भाग घेणार आहेत. तेथून हेलिकॉप्टरने मुख्यमंत्री चिकोडीला जाणार आहेत. कर्नाटक राज्य गोल्ल (यादव) हणबर संघटनेचा शतमानोत्सव व श्री यादवानंद स्वामीजींच्या 16 व्या पट्टाभिषेक समारंभात ते भाग घेणार आहेत. चिकोडी येथून हेलिकॉप्टरने सांबरा विमानतळावर येऊन विशेष विमानाने मुख्यमंत्री बेंगळूरला जाणार आहेत.









