कोल्हापूर
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले आहे. आता सर्वत्र जागा वाटपाची चर्च सुरू असताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री पद द्या, यासाठी सागर जाधव यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईल दंडवत घातला.
मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका पार पडल्या त्या एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा बघून पार पडल्या. माझी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आणि भाजपच्या सर्व नेते मंडळींना विनंती आहे की, मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनाच सुरुवातीला संधी द्यावी. महाराष्ट्राच्या जनसामान्यांच्या मनातही हीच भावना आहे. राज्यात महायुतीला मिळालेले यश हे शिंदे साहेबांनी जाहिर केलेल्या योजना, जनसामान्यांत मिसळणे आणि रात्रंदिवस कार्यरत राहणे या त्यांच्या कष्टाचे फळ आहे. म्हणून शिंदे साहेबांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून संधी मिळावी यासाठी आई अंबाबाईला मी आज दंडवत घालत आहे, अशी भावना सागर जाधव यांनी व्यक्त केली.








