ऑनलाईन टीम / तरुण भारत :
विरोधकांची ‘इंडिया’ नव्हे तर ‘इंडी’ आघाडी आहे. I.N.D.I.A आहे, ज्यात मध्ये डॉट आहेत. सगळे विरोधक येऊन आघाडी काढतात, हाच पंतप्रधान मोदींचा विजय आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांना इंडिया आघाडीच्या बैठकीचा महायुतीवर किती परिणाम होईल, असा प्रश्न मीडियाने विचारला. त्यावेळी ते म्हणाले, 2014 मध्ये मोदी पंतप्रधान झाल्यापासून विरोधक सैरभर झाले आहेत. त्यांनी मोदींना पाडण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण ते अयशस्वी ठरले. लोकांना विकास पाहिजे, भांडणं नको आहेत. एका सर्व्हेतून समोर आलं आहे की, 85 टक्के लोक मोदींना पुन्हा पंतप्रधान पदी पाहू इच्छितात. हे सगळे विरोधक एकत्र येत आहेत, हाच मोदींचा विजय आहे.
विरोधकांची आघाडी ही इंडिया आघाडी नाही तर ती इंडी आघाडी आहे. या आघाडीतील टोळ्यांच्या नावावर किती घोटाळे आहेत ते पाहा. यापूर्वीही ते एकत्र आले होते. त्यामुळे त्यांच्या आघाडीने मोदींना काहीही फरक पडणार नाही, असेही शिंदे म्हणाले.








