प्रतिनिधी/ पणजी
भारतीय राज्यघटनेच्या 75 व्या वर्धापनानिमित्त देशभरातील नागरिकांनी ‘कॉन्स्टिट्यूशन 75 डॉट कॉम’ शी संलग्न होऊन भारताच्या शाश्वत वारशावर चिंतन करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. रविवारी आपल्या मन की बात च्या 117 व्या भागात ते बोलत होते. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी एका बूथ कार्यकर्त्याच्या निवासस्थानी उपस्थित राहून हा कार्यक्रम पाहिला.
नुकत्याच गोव्यात पार पडलेल्या इफ्फीमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘केटीबी-भारत हैं हम’ च्या यशाचा उल्लेख करून माननीय पंतप्रधानांनी भारतातील सर्जनशील उद्योगांच्या वाढत्या प्रभावाकडे लक्ष वेधले.









