कुणकेरीतील श्री भवानी माता सावंत कुटुंबीयांचे कुलदैवत
ओटवणे | प्रतिनिधी
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांच्या कुटुंबीयांसह त्यांचे कुलदैवत असलेल्या कुणकेरी येथील श्री भवानी माता व श्री देवी भावईचे गुरूवारी सकाळी दर्शन घेत कृपार्शिवाद घेतला.यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यापूर्वी सभापती असताना कुलदेवतेच्या दर्शनासाठी आलो होतो. आता मुख्यमंत्री झाल्यावर आलो आहे. हा आज योगायोग जुळून आला. मी गावात आल्याने कुणकेरीवासियामध्ये एक वेगळाच आनंद असतो. माझ्या स्वागतासाठी तुम्ही सर्वजण आलात त्याबद्दल आभार. आणि तुमचं हे प्रेम असेच राहू दे असे सांगितले.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सावंतवाडी संस्थांनचे श्रीमंत खेम सावंत भोसले, युवराज लखम सावंत भोसले, माजी आमदार राजन तेली, भोसले नॉलेज सिटीचे अच्युत सावंत-भोसले, माजी सभापती प्रमोद सावंत, सरपंच सोनिया सावंत, शशिकांत सावंत, पोलिस पाटील तानाजी सावंत, विश्राम सावंत आदी कुणकेरीवासिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.