प्रतिनिधी /पणजी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल शुक्रवारी नवी दिल्ली दौऱयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी गोव्यातील विविध विषयांवर चर्चा केली. गोव्याच्या पुढील विकासासाठी मार्गदर्शन करावे, अशी विनंती डॉ. सावंत यांनी त्यांच्याकडे केली.
मोदी यांनी गोव्यातील विकासासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या भेटीचा अधिक तपशील उपलब्ध होऊ शकला नाही.
दरम्यान पर्यटनमंत्री रोहन खवंटे यांनी दिल्लीत केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन गोवा राज्यातील काही विषयांवर चर्चा केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.