विशेष प्रतिनिधी / पणजी
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच काही केंद्रीय मंत्र्यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आज दिल्लीत पोहोचत आहेत. तसेच दिल्लीत विविध प्रकारच्या सरकारी बैठकांचे आयोजन केले आहे. त्या बैठकांमध्येही ते भाग घेणार आहेत. संपूर्ण दिवसभर ते दिल्लीत असतील. रात्री उशिरा ते पुन्हा गोव्यात परतणार आहेत.









