मुंबई : दादर- सी फेसवर महापौर बंगल्यामध्ये सुरू होणाऱ्या दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक पुढील वर्षी सुरु होईल. या स्मारकांमधील भूमिगत गॅलरींचा समावेश असून त्यामध्ये शिवसेनाप्रमुखांची व्यंगचित्रे आणि त्यांच्या जीवन आणि राजकिय कारकीर्दीवरील व्हिडीयो आणि चित्रपट असणार आहेत. तसेच शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याची एक गॅलरी असेल पण त्यामध्ये तोतया मुख्यमंत्र्यांना जागा असणार नाही असे म्हणत शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला.
पुढे माहीती देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “ या स्मारकांमध्ये आतापर्यंतच्या शिवसेनेच्या सर्व मुख्यमंत्र्यांचे प्रदर्शन असतील. पण त्यात शिवसेनेचे नावाचा वापर करणाऱ्या ढोंगी लोकांचा समावेश असणार नाही.” असे बोलून त्यांनी त्यांनी पक्षाचे बंडखोर नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या गटावर टीकास्त्र सोडले.
शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे ४०० कोटी रुपयांचे स्मारक पुढील वर्षाच्या अखेरीस जनतेसाठी खुले केले जाईल. दादर सी फेसवरील तत्कालीन महापौरांच्या बंगल्यात सुरू होणाऱ्या या स्मारकामध्ये भूमिगत गॅलरीं होणार आहे. या गॅलरीमध्ये शिवसेनाप्रमुखांची व्यंगचित्रे जनतेसाठी खुली केली जातील. तसेच त्यांच्या जीवन आणि राजकिय कारकिर्दीवर व्हिडियो आणि चित्रपट असतील. मुंबईतील ऐतिहासिक वास्तू असलेल्या महापौर बंगल्यामध्ये ठाकरे कुटुंब आणि शिवसेना पक्षाच्या राजकिय वाटचालीवरही एक गॅलरी असणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








