वार्ताहर/बाळेकुंद्री
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील यल्लम्मा डोंगराला शुक्रवारी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांनी भेट देऊन यल्लम्मा देवीचे दर्शन घेतले. यावेळी भाजपचे नेते विरूपाक्षी मामनी, मंदिराचे कार्यनिर्वाहक अधिकारी एसपीबी महेश, देवस्थानचे अधीक्षक नागरत्ना चोळीन, अल्ल्लमप्रभू प्रभूनवर, आर. एच. सौंदत्ती, सदानंद ईटी, पंडित राजशेखरय्या, मंजुनाथगौडा संदीमनी यांनी लता शिंदे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी देवस्थानच्या कर्मचाऱ्यांसह पुजारीवर्ग उपस्थित होता.









