सावंतवाडी / प्रतिनिधी
”शासन आपल्या दारी” या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 30 मे रोजी सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर येणार होते. सदर कार्यक्रम सावंतवाडीत आयोजित करण्यात आला आहे. तसेच सावंतवाडीतील विविध प्रकल्पांची भूमिपूजन व उद्घाटन आयोजित करण्यात आले आहे. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांचा हा 30 मे चा दौरा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. 31 मे रोजी हा दौरा होणार असल्याची शक्यता आहे तशी माहिती सूत्रांनी दिली .









