दापोली :
दापोली विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आमदार योगेश कदम यांच्या प्रचारार्थ १६ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दापोलीत येत आहेत. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकालगतच्या आझाद मैदानात सकाळी ११ वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर दुसऱ्यांदा दापोलीत येणार आहेत.








