ऑनलाईन टीम/तरुण भारत
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज संभाजीराजे छत्रपती (sambhajiraje chhatrapati) यांची दिल्ली येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी संभाजीराजे यांनी मराठा उमेदवारांच्या नियुक्त्यांसाठी नुकताच शासनाने जीआर काढल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांचे अभिनंदन केले. तसेच उर्वरित उमेदवारांच्या नियुक्ती करिता समन्वय साधण्यासाठी मंत्रालयात स्वतंत्र डेस्क सुरू करावा, अशी मागणीही यावेळी संभाजीराजे यांनी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीराजे यांची दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षण व समाजाच्या इतर मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली. गडकोटांचे संवर्धन, मुंबई ते किल्ले रायगड असे सी फोर्ट सर्किट टूरिझम, पर्यटन विकास या विषयांवर देखील मुख्यमंत्र्यांबरोबर सकारात्मक चर्चाझाली असल्याची माहिती संभाजीराजे यांनी दिली आहे.
हे ही वाचा : उद्धव ठाकरे आयत्या बिळावर नागोबा – नारायण राणे
रम्यान, हे वर्ष राजर्षी शाहू छत्रपती महाराजांचे स्मृतीशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्त कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधीची तरतूद करावी, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली. राजर्षी शाहू छत्रपती महाराजांचे विचार-कार्य जगभरात पोहोचविण्यासाठी राज्य शासनातर्फे विशेष उपक्रम राबवावेत, अशी संकल्पना यावेळी मांडली.
यावेळी मंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे, खासदार हेमंत पाटील, कॅ. अभिजीत अडसूळ, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अंकुश कदम, स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते धनंजय जाधव उपस्थित होते.