खेड प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १५ नोव्हेंबर रोजी खेड दौऱ्यावर येत आहेत. तालुक्यातील तळे-चिंचवाडी येथील लक्ष्मण विठू कदम यांच्या निवासस्थानी दुपारी १२ वाजता आगमन होणार आहे. तळे-चिंचवाडी येथील नात्यातील व्यक्तीच्या उत्तरकार्य विधीस ते उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासमवेत माजी पर्यावरणमंत्री रामदास कदमदेखील हजर राहणार आहेत.
मंगळवारी सकाळी ११ वाजता राजभवन हेलिपॅडवर आगमन झाल्यानंतर शासकीय हेलिकॉप्टरने सकाळी ११.४५ वाजता भरणे येथे आगमन होईल. तेथून मोटारीने तालुक्यातील तळे-चिंचवाडीकडे प्रयाण करतील. दुपारी १२.३० वाजता तळे-चिंचवाडी येथून मोटारीने भरणे येथे आगमन होईल. दुपारी १२.४५ वाजता शासकीय हेलिकॉप्टरने भरणे येथून ठाणेकडे पयाण करतील.









