दापोली :
निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे १५ नोव्हेंबरला दापोलीत येत आहेत. यावेळी महायुतीची महासभा आयोजित करण्यात आल्याची माहिती महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार योगेश कदम यांनी दिली.
यावेळी ते म्हणाले, महायुतीच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना दरमहा १५०० रुपये दिले जातात ते आता २१०० रुपये
करण्यात आले आहेत. मात्र, विरोधक त्यावरही टीका करत आहेत. लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये दिल्यामुळे राज्याच्या तिजोरीवर ताण आला असून राज्याची तिजोरी रिकामी झाल्याची टीका होत आहे.









