Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खेडमधील सभास्थळी दाखल झाले आहेत. ५ मार्च रोजी उद्धव ठाकरेंनी खेडमधील सभेमधून शिंदे गटावर आणि भाजपावर परखड शब्दांत हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता पुन्हा खेडमधल्या त्याच गोळीबार मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर सभा घेतली आहे. या सभेला मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी उपस्थिती दर्शविली आहे. जवळपास लाखों लोकांची उपस्थिती असल्याचा अंदाज आहे.
सभेत दीपक केसरकर काय म्हणाले
एकनाथ शिंदे आणि फडणवीस सत्तेत आल्यानंतर फक्त संभाजीनगर नाव करण्याचा ठराव झाला नाही तर केंद्राची त्याला संमतीही मिळाली. त्यांना कुणीही फसवलेलं नाही. कुणीही पैशांसाठी विकलं गेलेलं नाही. जे काही बोललं जातंय, ते फक्त सहानुभूती मिळवणम्यासाठी. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांबरोबर राहिलो, म्हणून एकनाथ शिंदेंना धनुष्यबाण मिळाला असे दीपक केसरकर म्हणाले.
आमदार योगेश कदम काय म्हणाले
महापुरात तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लक्ष दिलं नाही तर एकनाथ शिंदेंनी मदत केली. ठाकरे गटाच्या अन्यायामुळे आम्ही पाऊल उचलले. भास्कर जाधव यांनी गुहागरमध्ये निवडून येऊन दाखवावं, असा इशारा आमदार योगेश कदम यांनी दिला.
उदय सामंत काय म्हणाले
या सभेने सिध्द केलय. दोन वर्षाने आमदार योगेश कदमच होणार आहे. 5 तारखेची सभा कॉर्नर सभा होती. ही सभा शिविगाळ करणारी होती. गेल्या 50 वर्षात अनेक सरकार गेली. अनेक मुख्यमंत्र्यांना पायउतार व्हावं लागलं. आज कोकणाने निश्चय केलाय बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत आहोत, म्हणजेच एकनाथ शिंदेंसोबत आहोत. दोपोली, खेड, मंडणगड, रत्नागिरीसाठी सर्वात जास्त निधी दिला. एकनाथ शिंदे कोकणाच्या विकासासाठी आले आहेत. योगेश कदमांना राजकिय संपवण्याचा प्रयत्न केला. एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांचे काम करत आहेत.कोकण तुमच्या पाठीशी आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री नाही कुटुंबप्रमुख म्हणून काम करताता असे कौतुकही केले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









