मंत्री माविन गुदिन्हो यांना वगळले, गेली सहा वर्षे केले होते प्रतिनिधीत्त्व
पणजी : जीएसटी मंडळातून (कौन्सिल) माविन गुदिन्हो यांना वगळण्यात आले असून त्यांच्या जागी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची वर्णी लावण्यात आली आहे. गेली सुमारे 6 वर्षे गुदिन्हो हे जीएसटी मंडळावर प्रतिनिधीत्व करीत होते. त्यांना अचानक वगळण्याचे नेमके कारण समजू शकले नाही. आता त्यांच्या जागी सावंत यांना जीएसटी मंडळावर कायमस्वऊपी सदस्य या नात्याने घेण्यात आले आहे. सावंत हे यापुढे जीएसटी मंडळाच्या सर्व बैठकांना हजेरी लावतील असे सांगण्यात आले. गोवा जीएसटीची जबाबदारी आता मुख्यमंत्र्यांकडे आली असून गुदिन्हो यांना त्यातून मुक्त करण्यात आले आहे.









