बेंगळूर : पालिका कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य ती कार्यवाही केली जाईल. शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रिक्त असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पदांची त्वरित भरती करण्यासाठी पावले उचलण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले. शुक्रवारी सिद्धरामय्या यांनी बेंगळूरमध्ये विविध पालिका संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली. शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पालिका कर्मचाऱ्यांच्या 2,992 रिक्त आहेत. यापैकी 492 पदे भरती करण्यात आली आहेत. उर्वरित पदे भरती केली जातील. 2023 मध्ये सरकारने 41373 पैकी 29 हजार कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केले आहे. उर्वरितांनाही सेवेत कायम केले जाईल, असे ते म्हणाले. सेवेत असताना मृत्युमुखी पडलेल्या पालिका कर्मचाऱ्यांवर अवलंबून असणाऱ्यांना 10 लाख रु. मदत दिली जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्पन्नातून मिळणाऱ्या रकमेतून ही मदत देण्यास मंजुरी देण्यात आली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Previous Articleसंत मीराला हँडबॉलमध्ये तिहेरी मुकुट, बालिका आदर्श विजेता
Next Article आमदार यत्नाळ यांच्याविरुद्ध एफआयआर
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









