वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशाचे सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांना संसर्गामुळे दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून प्रकृती सुधारत असल्याचे सांगण्यात आले. संसर्गासंबंधी सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. ते एक-दोन दिवस रजा घेऊन पुन्हा कामावर परततील अशी अपेक्षा आहे. दोनच दिवसांपूर्वी, 12 जुलै रोजी सरन्यायाधीश गवई हैदराबादमधील नालसर कायदा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हा कार्यक्रम आटोपून दिल्लीत परतल्यानंतर त्यांना संसर्गजन्य आजाराचा त्रास होऊ लागल्याने सोमवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.









