बेळगाव बार असोसिएशनच्यावतीने कार्यक्रम
प्रतिनिधी /बेळगाव
मुख्य जिल्हासत्र न्यायालयाच्या न्यायाधीशपदी मुस्तफाहुसेन सय्यद अजिज यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर बेळगाव बार असोसिएशनच्यावतीने सोमवारी त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. प्रभू यत्नट्टी होते.
न्यायाधीश मुस्तफाहुसेन अजिज यांनी यापूर्वी शिमोगा येथे मुख्य जिल्हासत्र न्यायाधीश म्हणून सेवा बजावली आहे. त्यानंतर त्यांची आता बेळगाव न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे. जुन्या लायब्ररीमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर बार असोसिएशन जनरल सेपेटरी यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
ज्ये÷ वकील एस. बी. शेख यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांचा थोडक्मयात परिचयही करून दिला. बार असोसिएशनच्या पदाधिकाऱयांनी जिल्हासत्र न्यायालयाचे न्यायाधीश मुस्तफाहुसेन अजिज यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी विविध न्यायालयाचे न्यायाधीश, बार असोसिएशनचे पदाधिकारी व वकील उपस्थित होते.









