रत्नागिरी :
छत्रपती संभाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाची प्रचिती आणून देणाऱ्या ‘छावा’ सिनेमाने रत्नागिरीतही धुम माजवली आहे. येथील सिटीप्राईड या चित्रपटगृहातील पुढच्या रविवावरपर्यंतचे तिन्ही थिएटरचे या सिनेमाचे सर्व शो हाऊसफुल्ल आहेत. येथील बॉक्स ऑफिसवर १४ तारखेला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने तुफान गल्ला जमवला आहे.
दरदिवशी होणाऱ्या १४ शोच्या माध्यमातून गेल्या ६ दिवसात सुमारे दीड कोटी रुपयांची कमाई केली आहे. छावा हा मराठा सम्राट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आगामी हिंदी भाषेतील ऐतिहासिक सिनेमा आहे. यात रश्मिका मंदन्ना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा आणि दिव्या दत्ता यांच्यासोबत विक्की कौशल मुख्य भूमिकेत आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास या सिनेमामध्ये उभा केला आहे. हा चित्रपट तरूण पिढीने उचलून धरला आहे. सर्व थरातील लोकांकडून त्याला चांगला प्रतिसात मिळत आहे. येथील सिटी प्राईडमध्ये तीन सिनेमागृहांमध्ये ‘छावा’ सिनेमाला रत्नागिरीकर प्रेक्षकांनी हाऊसफुल्ल प्रतिसाद दिला आहे. येथील तिन्ही सिनेमागृहांची आसन क्षमता सुमारे सहाशे नव्वद आहे. पण ते सर्व शो हाऊसफुल्ल आहेत. विशेष म्हणजे पुढच्या रविवारपर्यंत हे शो हाऊसफुल्ल आहेत. यापूर्वी बॉक्स ऑफिसवर चाललेल्या पुष्पा-२ पेक्षाही छावा सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचे येथील व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.








