बालविकास प्रकल्प अधिकारी मालवण व मालवण पोलीस ठाणे यांना अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे निवेदन
मालवण | प्रतिनिधी : अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्यावतीने पेन्शन, ग्रॅच्युईटी आणि अंगणवाडी कर्मचारी यांना सरकारी नोकरीत कायम करावे. या प्रमुख मागण्यांसाठी २५ जुलै रोजी दुपारी १ वा. बालविकास प्रकल्प अधिकारी, मालवण यांच्या कार्यालयावर छत्री मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती मालवण येथील अंगणवाडी कर्मचारी यांच्या वतीने देण्यात आली आहे.
अंगणवाडी कर्मचारी संघटना यांच्या वतीने विशाखा कुबल, नम्रता भगत, मधुरा रांगणेकर यांनी छत्री मोर्चा बाबत निवेदन बालविकास प्रकल्प अधिकारी मालवण व मालवण पोलीस ठाणे अधिकारी यांना देण्यात आले आहे.
छत्री मोर्चा दरम्यान प्रकल्प कार्यालयात जमल्यानंतर घोषणा देऊन शासनाचे लक्ष वेधले जाणार आहे. अशी माहिती निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.









