कंग्राळी बुद्रुक येथे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज पुतळ्यासाठी चबुतरा-कॉलम भरणी कार्यक्रम
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या महान विचारांचा आदर्श आजच्या युवावर्गाने आत्मसात करणे काळाची गरज आहे.आजच्या राजकर्त्यांनीसुद्धा या महान पुरूषांच्या महान विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन राज्य चालविल्यास देशात सुख, शांती नांदून देशाचे नंदनवन होईल, असे विचार उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. कंग्राळी बुद्रुक येथील चव्हाट गल्लीतील बाल संभाजी युवक मंडळ, ग्रामस्थ व उदार देणगीदार यांच्या सहकार्यातून चव्हाट गल्ली येथे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. यासाठी चबुतरा उभारणी, कॉलम भरणी कार्यक्रम नुकताच पार पडला.याप्रसंगी मान्यवरांनी वरील विचार मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक हभप भरमा गावडू पाटील होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यल्लाप्पा पाटील यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.
उपस्थित मान्यवरांचे भगवे फेटे बांधून व पुष्पगुच्छ देऊन बाल संभाजी युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. हभप प्रशांत पवार यांनी मंत्रपठण केल्यानंतर उपस्थित देणगीदारांच्या हस्ते कॉलम भरणीचे पूजन करून काँक्रीट ओतणीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी खालीलप्रमाणे देणग्या दिल्या. अनिल यल्लाप्पा पावशे यांच्याकडून 51000 रुपये, निवृत्त जवान कै. कल्लाप्पा कोनेरी यांच्या स्मरणार्थ आकाश कल्लाप्पा कोनेरी यांच्याकडून 25001 रुपये, प्रभाकर यल्लाप्पा पाटील 25 पोती सिमेंट, नागेश कल्लाप्पा धामणेकर, गोपाळ आनंद पाटील, प्रभाकर मारुती बेळगावकर प्रत्येकी 5555 रुपये, वैजू कल्लाप्पा हुरूडे 5001 रुपये, भारता भैरव पाटील, नागेंद्र कल्लाप्पा पाटील, सुप्रिया सुनिल कोळी प्रत्येकी 1001 रुपये, कल्लाप्पा मारुती पवार 501 रुपये. यावेळी ग्रा. पं. सदस्य दत्ता पाटील, दादासाहेब भदरगडे, नागेश मासेकर, भिमाजी पाटील, विठ्ठल कोळी, जनार्दन पाटील, शंकर पाटीलसह बाल संभाजी युवक मंडळचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार यल्लाप्पा पाटील यांनी केले.









