छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीचे उद्घाटन आज येळ्ळूर येथील राजहंसगडावर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते करण्यात आले.
बेळगाव जिल्हाप्रशासन, कन्नड व संस्कृती विभाग, केआरआयडीएल आणि पर्यटन विभागाच्या संयुक्त विद्यमाने राजहंसगड किल्ल्यावर प्रतिष्ठापित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले.
याप्रसंगी खासदार मंगल अंगडी, जिल्हापालक मंत्री गोविंद कारजोळ, गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी, आमदार अनिल बेनके, प्रादेशिक आयुक्त एम.जी. हिरेमठ , जिल्हाधिकारी नितेश पाटील व इतर सहभागी झाले होते.