आमदारांनी नगराध्यक्ष व संबंधित अभियंत्यांसह केली पाहणी. रस्ता रूंदीकरण कामालाही होणार प्रारंभ. वीज ट्रान्सफॉर्मर लवकर हलविण्यासाठी प्रयत्न.
डिचोली / प्रतिनिधी
डिचोलीतील शांतादुर्गा हायस्कुलसमोरील छत्रपती शिवाजी महाराज सर्कलच्या सभोवताली असलेला रस्ता लवकरात लवकर रूंद करण्यासाठी आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो यांनी सदर भागाची पाहणी केली. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चौथ्रयाला होणारे अपघात रोखण्यासाठी हा रस्ता रूंद करणे अत्यंत गरजेचे बनले आहे. त्यादृष्टीने सर्व सोपस्कार तातडीने पूर्ण करण्याची सूचना आमदार डॉ. शेट्यो यांनी संबंधित खात्यांच्या अभियंत्यांना दिली आहे.
गेल्या 2019 साली श्री शांतादुर्गा हायस्कुलसमोर बसविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्ता पुतळ्याच्या खालील चौथ्रयाला आतापर्यंत अनेकवेळा अपघात झालेले आहेत. साखळीहून म्हापसाच्या दिशेने जाण्राया लांब ट्रॉली गाड्यांना वळसा घेण्यात मोठी अडचण येते. परिणामी त्या वाहनांची धडक सदर चौथ्रयाला बसून त्याची मोडतोड होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या सर्कलमध्ये बसविण्यात आल्यानंतर येथील चारही रस्त्यांवर वाहतूक सिग्नल बसवून वाहतुकीची समस्या सोडविण्यात आली आहे. परंतु या लांब वाहनांमुळे चौथ्रयाला अपघात सुरू झाल्यानंतर पुतळ्याच्या मागे असलेल्या जागेत रस्त्याचे रूंदीकरण करून घेत सदर सर्कलचा रस्ता रूंद करण्याचे नियोजन आखण्यात आले होते. त्यासाठी रस्त्याच्या शेजारीच असलेला वीज ट्रान्सफॉर्मर रस्त्याच्या मागे नेण्याचा काम बाकी होते. या कामाला आता गती देत लवकरात लवकर हे सर्कल रूंद करण्यासाठी आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो व नगराध्यक्ष कुंदन फळारी यांनी पुढाकार घेतला आहे.
या पाहणीवेळी आमदार डॉ. शेट्यो यांच्यासह नगराध्यक्ष कुंदन फळारी, पालिका कनिष्ठ अभियंता नदीम शेख, वीज खात्याचे कार्यकारी अभियंता मुद्रस, सहाय्यक अभियंता रामा नाईक, कनिष्ठ अभियंता दिपक केरकर, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ता विभागाच्या कार्यकारी अभियंता रश्मी मयेकर व इतरांची उपस्थिती होती.

बोर्डे डिचोली येथील महामाया मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज सर्कल पर्यंतचा रस्ता दोन्ही बाजूंनी रूंद करण्याच्या कामाला लवकरच सुरूवात होणार असून त्या कामाबरोबरच याही सर्कलचे रूंदीकरण करण्याचे नियोजन आहे. या सर्कलचे रूंदीकरण झाल्यास चौथ्रयाला होणारे अपघात थांबणार. तसेच वाहतुकीतही सुरळीतपणा येणार. अशी माहिती आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो यांनी दिली.
(ँर्दे) माजी आमदारांनी अलाईनमेंट तपासण्याची केली होती मागणी
डिचोलीच्या या सर्कलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आल्यानंतर चारही बाजूंनी वाहतूक करण्राया वाहनचालकांना पुढील रस्ता व वाहने योग्यपणे दिसत नसल्याने अपघातांना आमंत्रण मिळणार. त्यामुळे या चार रस्त्यांच्या मध्यभागी असलेल्या सर्कलचे योग्य अलाईनमेंट करण्याची मागणी माजी आमदार नरेश सावळ यांनी केली होती. सदर सर्कल चारही रस्त्यांच्या तंतोतंत मध्यभागी नसल्याने अपघात घडणार असेही त्यांचे म्हणणे होते. त्याप्रमाणे काही अपघातही या सर्कलच्या रस्त्यावर झाले होते. या माजी आमदाराच्या मागणीला नंतर एका राजकीय गटाने विरोध केला होता. व त्या प्रकरणाला वेगळाच रंग चढला होता. वाहतुकीत सुसूत्रता यावी म्हणून वाहतूक सिग्नल बसविण्यात आले. पण या सर्कलची जागा योग्य नसल्यानेच या चौथ्रयाला वारंवार अपघात होत असल्याचे सिध्द झाले आहे.









