कोल्हापूर: छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यसभेच्या ६ व्या जागेसाठी अपक्ष म्हणून उभ राहणे ही भाजपची खेळी असल्याचा गौप्यस्फोट संभाजीराजेंचे वडील शाहू छत्रपती यांनी केला आहे. पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना त्यांनी हा खुलासा केला. संभाजीराजेंनी अपक्ष लढावं यासाठी भाजपाने त्यांना भाग पाडलं असल्याचेही त्यांनी सांगितले.
संभाजीराजेंना शिवसेनेने उमेदवारी दिली नाही त्यामुळे छत्रपती घराण्याचा अपमान झाल्याचा आरोप विरोधकांकडून होऊ लागला. याविषयी बोलताना ते म्हणाले, छत्रपती घराण्याचा अपमान असं म्हणता येणार नाही. ही पूर्णपणे संभाजीराजेंची राजकीय भूमिका होती. देवेंद्र फडणवीस आणि भाजपाची खेळी होती. भाजपने त्यांना भाग पाडलं. बहुजन समाजाच्या मतांमध्ये विभाजन व्हावं यासाठी भाजपानं जाणीवपूर्वक ही खेळी खेळल्याचा आरोप त्यांनी केला.
पुढे बोलताना ते म्हणाले, आता दीर्घकाळ लढाई करावी लागेल. हा संघर्ष खूप मोठा आहे. राष्ट्रपती नियुक्त खासदार होण्यासाठीही आमचा संभाजीराजेंना विरोध होता.राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवल्यानंतर त्यांचा पराभव झाला. त्यांनी आतापर्यंत जे निर्णय घेतले ते व्यक्तिगत घेतले आहेत. मला किंवा छत्रपती घराण्याला कुठलाही निर्णय विचारून घेतला नाही. पण मी कधीही विरोध केला नाही. राजकारणात जाण्यासाठी त्यांना खासदारकी हवी होती. राजकीय संघटना काढून त्यांना पुढे जायचं असेल तर त्यांना शुभेच्छा आहेत.
नेमके काय म्हणाले छत्रपती शाहू महाराज
-छत्रपती घराण्याचा अपमान याचा प्रश्न येत नाही, हे राजकारण आहे. माझ्यापर्यंत हा विषय आला असता तर विषय वेगळा असता पण तसं काही झालं नाही.
-उमेदवारी नाकारली याच्याशी घराण्याचा संबंध आला नाही. त्यांनी व्यक्तिगत उमेदवारी नाकारली. आमच्यात काही विचार विनमय झाला असता तर मी सहमती दिली असती.
-छत्रपती घराण्याचा निर्णय़ वैगेरे वेळोवेळी सांगत आले पण त्यांचे निर्णय हे सगळे व्यक्तिगत होते. घराण्याचा नव्हे म्हणजे मला विचारलेलं नाही, किंवा माझी समंती घेऊन पावलं उचलली असं झालं नाही.
-2009 सालापासून संभाजीराजे यांनी वाट वेगळी पकडली. भाजपनं दिलेल्या खासदारकीला माझा विरोध होता. पण शेवटी लोकशाही आहे. त्यावेळी देखील चर्चा झाली नाही. त्यांनी निर्णय घेतल्यानंतर मला सांगितलं होतं.
-राज्यसभेवर जाण्याबाबत त्यांचं जानेवारीपासून सर्व चालू होतं पण त्याची कल्पना काही दिली नव्हती.राज्यसभेमध्ये त्यांना जायचं होतं तसा त्यांनी प्रयत्न केला.
-खासदारकीची टर्म संपल्यानंतर फडणवीस यांच्याकडे गेले. अर्धा तासात त्याच्यात काही बोलणं झालं माहित नाही. पण काहीतरी बोलले असतील पण लगेच तिथून बाहेर पडल्यावर लगेच त्यांनी पक्षाची घोषणा केली.आणि अपक्ष राहणार म्हणून घोषणा केली.
-पाठिंबा पाहिजे होता तर इतर नेत्यांकडे सुद्धा जाणं गरजेचं होतं.तसा प्रयत्न केला पाहिजे होता.राज्यसभेसाठी गणित जुळवून आणता पक्ष घोषित करणं हा निर्णय़ चुकला. ज्यांच्याकडे मत जास्त आहेत त्यांच्याकडे ते अप्रोच झालं नाही.शेवटी लोकशाही आहे, त्यात काय चालतं हे सगळ्यांना माहित आहे.कुठं घोडं अडतंय अडतंय हे त्यांना माहित असायला पाहिजे होतं.
-स्वराज्य पक्ष स्थापन करणार आणि इकडे राज्यसभा मिळवणार.स्वराज्य पक्ष स्थापन करायचा होता तर तुम्हाला कुणाकडे जायची गरज नव्हती.राज्यसभा पाहिजे होती तर भाजपला भेटला तर महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटायला पाहिजे होतं..
-दोन ते तीन महिन्यापासून ही प्रक्रिया सुरु करायला पाहिजे होती.खूप उशीर केला होता त्यांनी.कोणत्याही पक्षात गेलं की बंधनं आलीच. स्वराज्य पक्ष मोठा केला तर एक राज्यसभा कशाला चार राज्यसभा मिळतील.
-मी शिवसेनेत गेलो होतो. विक्रमसिंह यांच्यासाठी आम्ही प्रचार केला होताा.
-2016 साली राज्यसभेत गेले त्यावेळी मला फक्त जाणार आहे असं सांगितलं होतं.विचार विनिमय माझ्याबरोबर केला असता तर….
-इतिहासकार, पवार साहेब होते यांच्याबरोवर विचार विनिमय केरायला पाहिजे होता. कुणाशी चर्चा करणं हे चुकीचे नाही. निर्णय घेतल्यावर मला सांगायचे.
-विचार विनिमय करायला माझ्याकडे कधी आले नाहीत..फडणवीस यांना भेटायला गेल्यानंतर त्यांनी काय सल्ला दिला माहीत नाही.तुम्ही अपक्ष राहिला तर आम्ही पाठिंबा देतो असं कदाचित सुचवलं असेल.
-फडणवीस यांना भेटून आल्यानंतर लगेल घोषणा केली. हे लिक केलं पाहिजे. आपण घोषणा केल्यानंतर सगळे आपल्याकडे धावून येतील पाठिंब्यासाठी हे कॅल्कूलेशन चुकलं.
-राजकारणामध्ये असं एकदम होत नाही. विचार विनिमय अनेक प्रकारचे असतात..छत्रपती घराण्याचे असल्यामुळं सगळे आपल्याकडे यायला पाहिजे असं होतं.
-छत्रपती घराण्याला पाठिंबा द्यायचा की नाही हा प्रश्न नव्हता तर संभाजीराजे यांना पाठिंबा द्यायचा की नाही हा प्रश्न होता.अॅटोमेटीक सर्व झालं पाहिजे हे सगळं चुकीचं.
-संजय पवार यांना उमेदवारी मिळाल्यावर फोन केला अभिनंदन केलं.संजय पवार यांना आधीच उमेदवारी मिळायला पाहिजे होती.आता चांगलं झालं.
ड्राफ्ट म्हणजे कच्चा मसुदा. फायनल झालं असतं आणि मग विचार बदलला असा तर मग यू टर्न मारला म्हणता आलं असतं. असेही ते म्हणाले.
Previous Articleवानखेडेंवर कारवाई झाली पाहिजे : गृहमंत्री
Next Article सावंतवाडीत मोफत नेत्र तपासणी शिबीर
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.