धामोड / वार्ताहर
छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीत राधानगरी तालुक्यातील धामोड येथील केंद्रावर चुरशीने मतदान सुरु आहे . दुपारी २ वाजेपर्यंत ६८३ पैकी तब्बल ६०२ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला . या केंद्रावरील मतदान दुपारपर्यंतच ८८ टक्के इतके झाले आहे .
हेही वाचा >>> गावागावात आमच्याबाजूने मतदान…सत्ताधाऱ्यांना बूथ टाकायला जागा नाही- आमदार सतेज पाटील
छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे धामोड परीसरात धामोड, लाडवाडी, नऊनंबर, कुरणेवाडी, जाधववाडी , केळोशी, कुंभारवाडी, आवचितवाडी , कोते , चांदे आदी गावातील ६८३ सभासद आहेत. सत्तारूढ महाडीक गटाने येथे डॉ. विश्वास बिडकर ( धामोड ) यांना तर विरोधी पाटील पॅनेलमधून दगडू चौगले (कुरणेवाडी ) यांना उमेदवारी दिली आहे. दोन्ही गटांनी धामोड येथे जाहीर सभा घेऊन राजकीय रंगत आणली होती . आज सुरु असलेल्या मतदानादिवशी दुपारी २ पर्यंत या खोऱ्यातील ६८३ पैकी तब्बल ६०२ मतदार सभासदांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला .