कोल्हापूर : आजपासून नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली. तब्बल दोन वर्ष कोरोना काळामुळे करवीर निवासानी अंबाबाईचं दर्शन भक्तांना घेता आलं नाही. यंदा मात्र कोरोना निर्बंधाशिवाय नवरोत्रोत्सव साजरा होत आहे. आज कोल्हापुरात अंबाबाई मंदिरात तोफेची सलामी देण्यात आली. नवरोत्रोत्सावाचा पहिलाच दिवस असल्याने भाविकांनी गर्दी केली. छत्रपती घराण्याकडून देवीच्या मानाची पूजा संपन्न झाली. यावेळी मधुरिमाराजे यांनी भाविकांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व भक्तांचे रक्षण करावे अशी देवीला प्रार्थना केली. आज पूजा संपन्न झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, करवीर निवासानी अंबाबाईच्या आशीर्वादाने तब्बल दोन वर्षांनंतर सुरळीत सुरु झालं आहे. आपण कोरोना काळातून सुखरूप बाहेर आलो आहोत. सर्व भक्तांना माझ्या शुभेच्छा. सर्वांनी नियमांचे पालन करत स्वत:ची काळजी घ्या. यंदा अंबाबाई दर्शन सर्वांना मिळणार आहे. त्यामुळे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. सर्व भक्तांना करवीरवायीयांकडून शुभेच्छा.
कोरोना काळ हा सर्वांसाठी कठीण होता. पुन्हा असं बघायला लागू नये. कोरोनामध्ये अनेकांना आपल्या कुटुंबातील सदस्यांना गमावलं आहे. आज अंबाबाईला प्रार्थना करते की सगळ्यांना सुख-समृध्द, आनंद आरोग्यदायी आशीर्वाद दे. त्यामुळे सगळ्यांना आनंदमय वातावरणात हा उत्साह साजरा करता येईल. तसेच आपणही सगळ्यांनी काळजी घेऊया असेही त्या म्हणाल्या.
Previous Articleआजपासून शारदीय नवरात्रोत्सव
Next Article शासकीय खर्चातून भाविकांना रिक्षा सेवा पुरविणार









