लॉर्डस्च्या मैदानावर पत्नीने केले प्रकाशन
वृत्तसंस्था / लंडन
भारतीय कसोटी संघातील माजी क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराच्या क्रिकेट प्रवासाचे वर्णन त्याची पत्नी पूजाने एका पुस्तकाच्या रुपाने केले. या पुस्तकामध्ये चेतेश्वरच्या कसोटी क्रिकेटमधील कामगिरीचा उल्लेख करण्यात आला. लॉर्डस्च्या क्रिकेट मैदानाच्या संकुलात असलेल्या लायब्ररीमध्ये या पुस्तकाचा समावेश करण्यात आला आहे.
2010 ते 2023 या 13 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये चेतेश्वरने कसोटीमध्ये दर्जेदार कामगिरी केली. भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्डस् मैदानावर झालेल्या तिसऱ्या कसोटीतील खेळाच्या तिसऱ्या दिवशी चेतेश्वर पुजाराला खास निमंत्रण देण्यात आले होते. लॉर्डस्च्या लायब्ररीमध्ये या पुस्तकाची एक प्रत ठेवण्यात आली असून या पुस्तकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. लंडनमधील नेहरु केंद्रामध्ये शुक्रवारी या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आयोजित केला होता. या समारंभाला चेतेश्वर पुजारा, पूजा पुजारा तसेच एमसीसीचे पदाधिकारी उपस्थित होते. 2023 साली लॉर्डस् मैदानावर झालेल्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेतील ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या अंतिम सामन्यात चेतेश्वर पुजाराने भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. चेतेश्वरच्या क्रिकेट कारकिर्दीतील हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला.









